वेतन व संपत्तीतील असमानता – एक अभ्यास
DOI:
https://doi.org/10.64751/4e8qqn28Abstract
आज जगातील अनेक देशांमध्ये तसेच भारतातही वेतन व संपत्तीतील असमानता वाढताना दिसून येते. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. आर्थिक असमानता म्हणजे समाजाच्या समुहातील उत्पन्न (income) आणि संपत्ती (wealth) यांचे असमान वितरण होणे होय. म्हणजेच सर्व लोकांना समान आर्थिक संधी, उत्पन्न किंवा संपत्ती प्राप्त होत नाही. त्यामुळे श्रीमंत व गरीब यांच्यातील अंतर वाढते. आधुनिक समाजात आर्थिक विकास, औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणामुळे संपत्ती निर्माण होण्याचा वेग वाढला आहे. परंतु या विकासासोबतच वेतन आणि संपत्तीतील असमानता ही गंभीर सामाजिक-आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. समाजातील काही व्यक्ती किंवा वर्गाकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती व उत्पन्न जमा होते, तर मोठा वर्ग कमी वेतनावर किंवा अल्प उत्पन्नावर जीवन जगतो. या परिस्थितीमुळे समाजात आर्थिक, सामाजिक व राजकीय असंतुलन निर्माण होते.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






