नर्सिंग क्षेत्रात पुरुष परिचारकांना येणारी व्यावसायिक, सामाजिक व मानसिक आव्हाने : एक समाजशास्त्रीय अभ्यास
DOI:
https://doi.org/10.64751/6gssca38Abstract
नर्सिंग व्यवसाय हा आरोग्य व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील घटक आहे. इतिहासात हा व्यवसाय महिलांशी संबंधित मानला जात असला तरी आधुनिक काळात पुरुषांचा सहभाग या क्षेत्रात वाढला आहे. तथापि, पुरुष परिचारकांना या क्षेत्रात अनेक व्यावसायिक, सामाजिक, आणि मानसिक आव्हानांचा सामना करावा लागतो. नर्सिंग व्यवसायात पुरुषांचा सहभाग वाढला असला तरी त्यांना लिंगभेद, सामाजिक रूढी, व्यावसायिक मर्यादा, आणि मानसिक ताण यांसारख्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
या संशोधनाचा उद्देश नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुष परिचारकांना येणाऱ्या विविध समस्यांचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणे हा आहे. हे संशोधन विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत पुरुष परिचारकांची मुलाखत, प्रश्नावली आणि इतर दुय्यम स्त्रोतांच्या सहाय्याने त्यांच्या अनुभवांचा अभ्यास करून या समस्या आणि आव्हानांचा शोध घेतो. संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, नर्सिंग क्षेत्रात पुरुषांचा सहभाग वाढवण्यासाठी लिंगसमतेबाबत समाजात जागरूकता आणि सकारात्मक समज निर्माण करणे आवश्यक आहे.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






