मुगलकालीन संगीत : एक अभ्यास

Authors

  • प्रा.डॉ.नरेश एल. गोंडाणे Author
  • प्रा.दिपक महादेव जामनिक Author

DOI:

https://doi.org/10.64751/bx91qb53

Abstract

भारतीय संगीताच्या इतिहासात ‘मुगलकाल’ हा अतिशय महत्वाचा काळ होता. मुगलांनी भारतीय संगीताला कमी-अधिक प्रमाणात विकसीत करण्याचे काम केले होते व संगीताचा प्रचार प्रसार करण्याचे काम केले. मुगल राजांनी संगीतातील अनेक संगीतज्ञांना आपल्या दरबारात नियुक्त केले होते. संगीतज्ञानांचा मानसन्मान केला जात होता व त्यांना पुरस्कृत करून विशिष्ट प्रकारचे धन दिल्या जात होते. मुगलांच्या पूर्वी अनेक मुस्लीमांनी भारतावर आक्रमण केले. ते आक्रमण म्हणजे भारतातील खजिना, सोने, चांदी लुटण्याचे काम केले होते. ही सुरवात मुहम्मद गजनबी यांच्या कारकिर्दीपासून सुरूवात झाली होती. मुहम्मद गजनबी  यांनी भारतावर बरेच वेळा आक्रमण केले व भारतातील खजिना घेऊन पुन्हा आपल्या देशात निघून गेले. परंतु काही मुस्लीमांना आपला भारत देश आवडला होता. ते भारतातच स्थायीक झाले व भारतावर अनेक वर्षापर्यंत राज्य केले. त्यात पहिला काळ म्हणजे सल्तनत काळ. हया काळात मोहम्मद गौरी, त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक, खीलजी काळातील अल्लाउद्दीन खीलजी. त्यानंतर तुघलक काळात मुहम्मद तुघलक व लोदी काळात बहोलाल लोदी, सीकंदर लोदी व इब्राहीम लोदी यांच्या काळात यांच्या दरबारात अनेक संगीतज्ञ राहत होते व या राजांनी संगीत कलेला आश्रय दिला होता. यांच्या काळात संगीतकलेचा विकास करण्याकरीता व प्रचार करण्याकरीता या वरील शासकांनी आपल्या सोबत अरब वरूण संगीतकार आणले होते व त्यांनी फारसी, अरबी, तुर्की या सारख्या भाषेचे मिश्रण करून संगीत कलेला समृध्द बनविले  होते आणि संगीताचा प्रचार प्रसार केला होता.

Downloads

Published

2026-03-19

How to Cite

प्रा.डॉ.नरेश एल. गोंडाणे, & प्रा.दिपक महादेव जामनिक. (2026). मुगलकालीन संगीत : एक अभ्यास . International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 151-159. https://doi.org/10.64751/bx91qb53