शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या कादंबऱ्यातील स्त्रीदर्शन

Authors

  • प्रा. विशाखा एम. लोहकरे Author

DOI:

https://doi.org/10.64751/nafrk380

Abstract

कादंबरी कविता आणि समीक्षा अशा साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये लेखन करणाऱ्या मुक्तिबोधांच्या साहित्याने अनेक समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले, प्रशंसा संपादन केली आधुनिक मराठी साहित्याच्या परंपरेमध्ये एक स्वतंत्र आणि प्रतिष्ठेचे स्थान मिळविले एकीकडे दि. के. बेडेकर, त्र्यं. वि. सरदेशमुख, वि. स. जोग, भालचंद्र फडके अशा जानकार समीक्षकांच्या वेधविषय बनणारे मुक्तिबोधांचे साहित्य समांतरपणे रसिक-वाचकालाही सातत्याने आवडत आले. विविध सन्मान, पुरस्कार यांच्या रूपाने मुक्तिबोधाच्या साहित्याला एक व्यापक अनुमतीही मिळाली.

शरच्चंद्र मुक्तिबोध यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत काव्य, समीक्षा या दोन्ही क्षेत्रात विपुल निर्मिती केली. कादंबऱ्या मात्र तीनच लिहिल्या. त्यांच्या काव्य आणि समीक्षा लेखनाची समीक्षकांकडून जेवढी चर्चा झाली त्यामानाने कादंबरीची समीक्षा कमीच झालेली दिसून येते, परंतु प्रसिद्ध समीक्षक श्री. रा. भा. पाटणकर यांनी मुक्तिबोधाच्या संपूर्ण साहित्याची समीक्षा करताना त्यांच्या ‘मुक्तिबोधांचे साहित्य’ या ग्रंथात कादंबरीच्या समीक्षेला अग्रक्रम दिलेला आहे. यावरून त्यांच्या कादंबरीची मौलिकता आपल्या लक्षात येते.

Downloads

Published

2026-03-19

How to Cite

प्रा. विशाखा एम. लोहकरे. (2026). शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या कादंबऱ्यातील स्त्रीदर्शन. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 430-435. https://doi.org/10.64751/nafrk380