नागपूर शहरातील पारंपरिक बाजारपेठेत डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयोगावर उद्भवणाऱ्या व्यत्ययाचा अभ्यास
DOI:
https://doi.org/10.64751/5s8knr85Abstract
आजच्या काळात मोबाईल, इंटरनेट, UPI आणि सोशल मीडियामुळे खरेदी-विक्रीच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. या बदलाचा परिणाम नागपूर शहरातील ईतवारी, महल, गांधीबाग आणि सिताबर्डी या पारंपरिक बाजारपेठांवर कसा होत आहे, याचा या अभ्यासात आढावा घेतला आहे. या बाजारपेठांमध्ये अनेक वर्षांपासून विश्वास, प्रत्यक्ष संवाद आणि ओळख यांवर आधारित व्यापार चालत आला आहे; मात्र आता काही ग्राहक ऑनलाईन खरेदीकडे वळत आहेत आणि काही व्यापारी डिजिटल पेमेंट स्वीकारू लागले आहेत. डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारताना लहान व्यापाऱ्यांना अनेक अडचणी येतात. तांत्रिक ज्ञानाचा अभाव, इंटरनेट व नेटवर्क समस्या, व्यवहार अडकणे, सायबर फसवणुकीची भीती, तसेच डिजिटल व्यवहारांवरील खर्च यामुळे त्यांना अडथळे जाणवतात. मोठ्या ऑनलाईन कंपन्यांच्या सवलती आणि घरपोच सेवेमुळे स्थानिक विक्रेत्यांच्या विक्रीवरही परिणाम होतो. विशेषतः वृद्ध व्यापाऱ्यांसाठी या बदलाशी जुळवून घेणे अधिक कठीण ठरते.
तरीही या संशोधनातून असे दिसून आले की योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाल्यास व्यापारी डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करून ग्राहकसंख्या वाढवू शकतात. त्यामुळे डिजिटल परिवर्तन हे केवळ धोका नसून संधीही आहे. पारंपरिक बाजारपेठांचे अस्तित्व टिकवण्यासाठी डिजिटल साक्षरता, स्थानिक प्रशिक्षण आणि योग्य धोरणात्मक मदत आवश्यक आहे. नागपूरच्या या बाजारपेठांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत जुनी ओळख आणि विश्वासह कायम राखणे ही काळाची गरज असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






