वेतन आणि संपत्ती विषमता: एक संशोधनात्मक अभ्यास व प्रश्न. Wage and Wealth Inequality
DOI:
https://doi.org/10.64751/0g30er11Abstract
आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत उत्पन्न आणि संपत्तीचे समान वितरण होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात आर्थिक वाढीचा लाभ समाजातील सर्व घटकांना समान प्रमाणात मिळत नाही. परिणामी वेतन (income) आणि संपत्ती (wealth) यामध्ये विषमता वाढतांना बघायला मिळते. ही विषमता केवळ आर्थिकच नाही तर शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय स्वरूपाची ही आहे. त्यामुळे वेतन आणि संपत्ती विषमता हा विषय अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि सार्वजनिक धोरण या सर्व क्षेत्रांसाठी महत्त्वाचा ठरताना दिसतो. आजच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीत वेतनातील असमानता संपत्तीचे केंद्रीकरण आणि आर्थिक विषमता हे गंभीर सामाजिक प्रश्न आहे. वेतनाच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करतो शिक्षण, आरोग्य आणि कुटुंबाच्या विकासासाठी खर्च करते .दुसरीकडे बचत, योग्य नियोजन आणि गुंतवणूक यांच्या साह्याने वेतनातून संपत्तीची निर्मिती होते. त्यामुळे वेतन आणि संपत्ती यांचा परस्पर संबंध अतिशय जवळचा विषय आहे. वेतन आणि संपत्ती हे मानवी जीवनातील महत्त्वाचे दोन पैलू आहे.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






