मानवीय साधनांचे व्यवस्थापन - एक अध्ययन

Authors

  • डॉ. विद्या मुकूंद ठवकर Author

DOI:

https://doi.org/10.64751/egwjb150

Abstract

औद्योगिक क्रांतीपूर्वी व्यवसाय घरगुती स्वरूपाचे होते पिढयानपिढया व्यवसायाचे व्यवस्थापनही चुका आणि शिका पध्दतीने होते. व्यवसाय चालवण्याचे कौषल्य अनुभवातून संपादन केले म्हणजे व्यवसायचे व्यवस्थापन करता येते. व्यवसायाचा व्याप मर्यादित होता. कर्मचारी आणि मालक यांचे व्यक्तिगत संबंध आणि जवळीकता यामुळे व्यवसाय चालवणे किंवा व्यवसायाचे व्यवस्थापन करणे फारसे अडचणीचे नव्हते परंतु औद्योगिक क्रांतीनंतर उद्योग-व्यवसायाचे स्वरूप पालटले. कर्मचाऱ्यांची संख्या वाढली. व्यवसायांचा दिवसेंदिवस विस्तार होवू लागला आणि त्यानंतर आपला व्यवसाय कसा चालवावा हा प्रष्न निर्माण झाला. दुसऱ्या शब्दात व्यवसाय विषयक समस्या तीव्र आणि गंभीर झााली. झपाटयाने होणाऱ्या औद्योगिक प्रगतीने व्यवस्थापन क्षेत्रासमोर आव्हान उभे केले. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात संपूर्ण जग एक खेडे झालेले आहे. त्यामुळे व्यवसाय विस्ताराबाबतच्या कल्पना देष-विदेषात सहज राबवता येतात. परंतु असे करत असतांना उद्योग व्यवसायाषी संबंधित विविध घटकांचे योग्यरित्या व्यवस्थापन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. उत्पादनासाठी लागणाऱ्या आणि सामान्यतः सर्वांनाच परिचित असलेल्या भांडवल, भूमी, कच्चामाल, यंत्रसाम्रगी आणि कर्मचारी या घटकांचे व्यवस्थितरित्या व कार्यक्षमतेने व्यवस्थापन षाखा आहेत. उदा. भांडवलाचे व्यवस्थापन, कच्चामालांचे व्यवस्थापन इत्यादी त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन ही सुध्दा व्यवस्थापन शास्त्राची स्वतंत्र्य शाखा आहे.

Downloads

Published

2026-03-19

How to Cite

डॉ. विद्या मुकूंद ठवकर. (2026). मानवीय साधनांचे व्यवस्थापन - एक अध्ययन. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 667-671. https://doi.org/10.64751/egwjb150