राजकीय बदलते स्वरूप, युवा संस्कृती आणि राजकारण

Authors

  • प्रा. हेमंत संतोषराव तिमांडे Author

DOI:

https://doi.org/10.64751/4em9tm40

Abstract

समग्र विश्वामध्ये भारताला लोकशाही कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते. आज राजकारणाचे स्वरूप हे बदलताना दिसत आहे. राजकीय क्षेत्र हे गुंतागुंतीचे होत असून लोकशाही पुढील आव्हान निर्माण करणारे आहे. राजकीय दृष्ट्या विचार केल्यास देशातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून युवकांच्या विविध संघटना कार्यरत आहेत. या संघटनांमधून नवीन नेतृत्व उदयास येत आहे.

आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे जगामध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडून आले आहे. जेव्हा देश ही संकल्पना उच्चारतो तेव्हा तिचा अर्थ काय हे आधी समजून घेणे गरजेचे आहे. देशाच्या सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे की सत्तारूढ सरकारने सामान्य जनतेचे हित जपले पाहिजे, विकासाचे धोरण आखणे, नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, तसेच आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे हे शासनाचे कर्तव्य आहे.

युवा संस्कृती आणि राजकारण यांचा जवळचा संबंध आहे. युवा संस्कृती ही तरुणांच्या मूल्यांना आकार देणारी ठरते. त्यामुळे ते सामाजिक आणि राजकीय बदलांचे माध्यम बनते. राजकारण हे तरुणांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ देते, ज्यामुळे ते त्यांच्या पिढीतील विविध समस्यांवर (रोजगार, शिक्षण, पर्यावरण इ.) आपला आवाज बुलंद करू शकतात आणि देशाच्या लोकशाहीला अधिक बळकट करू शकतात.

आज घडीला तरुणांचा सहभाग हा केवळ मतदान करण्यापुरता मर्यादित न ठेवता ते सक्रिय कार्यकर्ते म्हणून निर्माण व्हावेत हा त्यामागचा उद्देश आहे.

Downloads

Published

2026-03-19

How to Cite

प्रा. हेमंत संतोषराव तिमांडे. (2026). राजकीय बदलते स्वरूप, युवा संस्कृती आणि राजकारण. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 687-690. https://doi.org/10.64751/4em9tm40