नागपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये (2009–2019) काँग्रेस पक्षाच्या प्रचारधोरणावर सोशल मीडियाचा झालेला परिणाम: एक विश्लेषणात्मक अभ्यास

Authors

  • किरण आसारामजी निघोटे Author
  • डॉ. शीलात संजय खेडीकर Author

DOI:

https://doi.org/10.64751/14dwf772

Abstract

प्रस्तुत संशोधनात 2009 ते 2019 या दशकातील नागपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रचार धोरणातील बदलांचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे पारंपरिक प्रचार पद्धतींपासून आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मकडे (सोशल मीडिया) झालेला प्रवास हा या संशोधनाचा केंद्रबिंदू आहे.

संशोधनात प्रामुख्याने तीन कालखंडांचा विचार करण्यात आला आहे: 2009 ची निवडणूक (पारंपरिक साधनांचा प्रभाव), 2014 ची निवडणूक (डिजिटल लाटेचा उदय आणि वाढ) आणि 2019 ची निवडणूक (नियोजित डिजिटल वॉर रूम आणि आक्रमक धोरण). नागपूर जिल्ह्याच्या विशेष संदर्भात शहरी व ग्रामीण मतदारसंघांतील सोशल मीडियाच्या प्रभावातील फरक स्पष्ट करण्यात आला आहे.

अभ्यासातून असे दिसून आले की, 2014 च्या निवडणुकांनंतर काँग्रेसने आपल्या प्रचारामध्ये बदल करून सोशल मीडियाचा वापर प्रतिमा निर्मिती आणि स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी प्रभावीपणे केला आहे. 2019 मध्ये डिजिटल वॉर रूम आणि कंटेंटच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यात पक्षाला काही प्रमाणात यश मिळाले.

मात्र, सोशल मीडियावरील लाईक्सचे प्रत्यक्ष मतांत रूपांतर होण्यासाठी त्याला मजबूत संघटनात्मक बांधणीची जोड असणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट झाले. हे संशोधन राजकीय धोरणकर्ते, अभ्यासक आणि निवडणूक रणनीतिकारांसाठी मार्गदर्शक ठरते.

Downloads

Published

2026-03-19

How to Cite

किरण आसारामजी निघोटे, & डॉ. शीलात संजय खेडीकर. (2026). नागपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये (2009–2019) काँग्रेस पक्षाच्या प्रचारधोरणावर सोशल मीडियाचा झालेला परिणाम: एक विश्लेषणात्मक अभ्यास. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 709-718. https://doi.org/10.64751/14dwf772