निम्न वर्धा प्रकल्पामुळे विस्थापितांना येणाऱ्या समस्या व उपजीविकेच्या वर्तमान स्थितीचे अध्ययन
DOI:
https://doi.org/10.64751/m262vh61Abstract
भारतामध्ये विकास प्रकल्पांमुळे कृषी विकास, सिंचन सुविधा व आर्थिक प्रगती साध्य होते; परंतु त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर लोकांचे विस्थापन देखील घडते. निम्न वर्धा प्रकल्प हा विदर्भातील महत्त्वाचा सिंचन प्रकल्प असून त्याचा शेती विकासासाठी मोठा फायदा झाला आहे. तथापि, या प्रकल्पामुळे अनेक गावांतील कुटुंबांना स्थलांतर करावे लागले आणि त्यांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात मूलभूत बदल झाले.
प्रस्तुत अध्ययनात 367 विस्थापित उत्तरदात्यांची निवड करून त्यांच्या उपजीविका, सामाजिक स्थिती आणि प्रमुख समस्यांचा अभ्यास करण्यात आला. माहिती संकलनासाठी संरचित मुलाखत अनुसूची, निरीक्षण आणि गटचर्चा पद्धतींचा वापर करण्यात आला. अध्ययनातून रोजगार अभाव, आर्थिक असुरक्षितता, शिक्षणाची मर्यादा, सामाजिक समायोजनातील अडचणी आणि निवास समस्या या प्रमुख अडचणी असल्याचे स्पष्ट झाले. पुनर्वसन प्रक्रियेत जमीन किंवा आर्थिक भरपाई देणे पुरेसे नसून दीर्घकालीन उपजीविका सुरक्षा व सामाजिक समावेशन आवश्यक असल्याचे निष्कर्षातून दिसून आले. सामाजिक कार्य हस्तक्षेपाद्वारे विस्थापितांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे शक्य आहे.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






