स्त्रीमुक्ती चळवळ आणि सद्यस्थितीतील आव्हाने
DOI:
https://doi.org/10.64751/wvfrn215Abstract
भारतामध्ये स्त्रीवादी चळवळीचा विकास विविध राजकीय पटलांमधून आणि स्त्रियांच्या शोषणाच्या विरोधातील विविध रूपातील चळवळी मधून झालेला दिसून येतो. स्त्रियांचे शोषण, लिंगभाव व लिंगभेद या मुद्द्यांवर स्त्रीवादी चळवळी उभ्या राहिलेले आहेत. स्त्रियांच्या शोषणाला प्रामुख्याने पुरुषप्रधान व्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था अनेक जाती वर आधारित पदसोपानात्मक समाजरचना प्रामुख्याने कारणीभूत असते, यावर लक्ष केंद्रित झाले. स्त्रियांच्या शोषणाला पुरुषप्रधान भांडवली व्यवस्था जबाबदार असतेच असते , पण श्रम, उत्पादन, पुनरुत्पादन यातून घडणाऱ्या संरचनात्मक संस्था आहे कारणीभूत असतात, हे स्त्रीवादी चळवळीने अधोरेखित केले. स्त्रियांचे गृहकाम, कुटुंबातील लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांचे संगोपन , शेतीत सहाय्यक म्हणून केलेली कामे, शेती संबंधित इतर कामे ही सर्व विनावेतन असतात. या दोन्ही स्वरूपातील कामांनी सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेला हातभार लागत असतो. याकडे स्त्रीवादी चळवळींनी लक्ष पुरविले आहे. पितृसत्ताक समाजामध्ये घरातील अथवा कामाच्या ठिकाणी होणारी हिंसा आणि प्रमुख सामाजिक, आर्थिक, राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये स्त्रियांना स्थान न मिळणे या मुद्द्यांवर ही स्त्रीवादी चळवळींनी विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. कुटुंबातर्गत होणारी हिंसा, लैंगिकता, लैंगिक संबंधातील शोषण हे जात, रुढी, परंपरा, संस्कृती या संस्थात्मक प्रारूपातून होते.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






