विजय तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाईंडर’ मधील स्त्री-पुरुष संबंधातील गुंतागुंत

Authors

  • खगेशकुमार मधुकर सहारे ,डॉ. विजय ह. रैवतकर Author

DOI:

https://doi.org/10.64751/bbxr6t94

Abstract

विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाईंडर’ (१९७२) हे नाटक मराठी नाट्यसृष्टीतील एक मैलाचा दगड मानले जाते. तत्कालीन समाजातील नैतिकतेच्या खोट्या कल्पनांना धक्का देणारे हे नाटक प्रामुख्याने स्त्री-पुरुष संबंधांतील गुंतागुंत, नैतिकतेचे प्रश्न, आदिम प्रेरणा, सत्तासंघर्ष आणि समाजातील पितृसत्ताक मानसिकतेचे वास्तववादी व कठोर चित्रण करते. या नाटकात सखाराम, लक्ष्मी आणि चंपा ही प्रमुख पात्रे आहेत. त्यातील मुख्य पात्र असणारा सखाराम समाजाच्या रूढ नैतिकतेला न जुमानता घराबाहेर काढलेल्या किंवा अत्याचार सहन केलेल्या स्त्रियांना आश्रय देतो. मात्र त्यांच्यावर स्वतः तयार केलेले नियम लादतो. त्यामुळे या नाटकात स्त्री-पुरुष संबंधातील संघर्ष, सत्ता, वर्चस्व, शोषण, स्वातंत्र्य आणि भावनिक गुंतागुंत स्पष्टपणे दिसते.

     विजय तेंडुलकरांनी या नाटकात समाजाने नाकारलेल्या आणि प्रस्थापित नैतिक चौकटीबाहेर जगणाऱ्या पात्रांच्या माध्यमातून मानवी स्वभाव, आदिम हिंसेची ओढ आणि लिंगाधारित सत्तासंघर्ष यांतील गुंतागुंत मांडली आहे. सखाराम, लक्ष्मी आणि चंपा या तीन प्रमुख पात्रांच्या परस्परसंबंधांतून निर्माण होणारा तणाव, शोषणाचे स्वरूप, सामाजिक वास्तव, मानवी अपरिहार्यता आणि हिंसेचा शोध घेणे हा या शोधपत्रिकेचा मुख्य उद्देश आहे. सोबतच समाजातील लैंगिक असमानता, सत्ता संबंध, नैतिक मूल्ये आणि मानवी स्वभावातील विरोधाभास या सर्व घटकांचा अभ्यास करून नाटकातील स्त्री-पुरुष संबंधांचे विविध पैलू विश्लेषणात्मक पद्धतीने अभ्यासले आहेत.

Downloads

Published

2026-04-16

How to Cite

खगेशकुमार मधुकर सहारे ,डॉ. विजय ह. रैवतकर. (2026). विजय तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाईंडर’ मधील स्त्री-पुरुष संबंधातील गुंतागुंत. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 906-911. https://doi.org/10.64751/bbxr6t94