कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये पोषक आहाराच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या समस्या व उपाय
DOI:
https://doi.org/10.64751/rfwffv55Abstract
‘वसुधैव कुटुंबकम’ या संस्कृत उक्ती प्रमाणे ‘परिवारातील एक सुदृढ स्त्री असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहू शकते. संशोधक याच विषयासंबंधित अभ्यास करीत असल्यामुळे अन्न व अन्नाविषयीचे महत्त्व अर्थात पालेभाज्या, फळभाज्या, फळे, दुध, अंडी, मांस याचे आहारात स्थान आणि त्याचा उपभोग केव्हा व कशा पद्धतीने घ्यावयाचा आहे. याबद्दलची माहिती विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थीनीना देण्याची संधी मिळाली. या सर्व कारणामुळे हा विषय संशोधकीने निवडला. शिक्षण क्षेत्रात सर्वाना शिक्षण घेता यावे म्हणून शासनाने मुलींना १२ वी पर्यंत मोफत शिक्षण योजना लागू केली. त्याचबरोबर त्यांना शिष्यवृत्ती दिल्या जाते. तसेच बालवाडीपासून पोषक आहाराचीही योजना केलेली आहे. तरीही पोषक आहाराचा अभाव जाणवतो. एक महिला या नात्याने मला मुलींच्या समस्या अधिक जाणवल्या त्यात प्रमुख समस्या म्हणजे पोषक आहाराचा अभाव ही होय. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये पोषक आहाराच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या समस्या अभ्यासून त्यावर उपाययोजना सुचविल्या आहेत.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






