भंडारा जिल्ह्यातील गोसावी जमातींचा स्थलांतर आणि चळवळींचा अभ्यास
DOI:
https://doi.org/10.64751/a5wwms93Abstract
हा अभ्यास महाराष्ट्र राज्य भंडारा जिल्ह्यात राहणाऱ्या गोसावी जमातींचा स्थलांतर आणि सामाजिक चळवळींच्या शोध घेतो. गोसावी ही भारतातील एक पारंपारिक भटक्या अर्ध- भटक्या स्वरूपाची जमात आहे. ऐतिहासिक दृष्ट्या धार्मिक परंपरा, भिक्षाटन तसेच लहान - मोठे व्यवसाय यांवर त्याचा उदरनिर्वाह चालत असे. सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय कारणामुळे या जमातीला सतत स्थलांतर करावे लागले. स्थलांतरामुळे शिक्षण, आरोग्य, रोजगार व सामाजिक ओळख यासारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या या समस्यांच्या पार्श्वभूमीवर गोसावी समाजात विविध सामाजिक चळवळी उद्यास आल्या. या चळवळींच्या माध्यमातून शिक्षण, सामाजिक हक्क, ओळख आणि विकासासाठी प्रयत्न करण्यात आले. या संशोधनात प्राथमिक आणि दुय्यम डेटा विश्लेषणासाठी वापरला गेला आहे. गोसावी जमातीच्या १०० प्रतिसादकांचे नमुना काढला आहे. या संशोधनात गोसावी जमातीच्या स्थलांतराच्या कारणांचा तसेच त्यांच्या सामाजिक चळवळींचा अभ्यास करण्यात आला आहे.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






