युवकांमधील विचलनाची उपसंस्कृती: एक समाजशास्त्रीय अध्ययन

Authors

  • डॉ. विनोद श्रावण शेंडे Author

DOI:

https://doi.org/10.64751/qdh79v05

Abstract

प्रस्तुत शोधनिबंध आधुनिक समाजातील युवकांमध्ये विकसित होणाऱ्या 'विचलनाच्या उपसंस्कृती'चा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. 'विचलन' म्हणजे प्रस्थापित सामाजिक नियमांचे उल्लंघन करणे. जेव्हा युवकांचा एखादा गट मुख्य प्रवाहातील मूल्यांना नाकारून स्वतःची स्वतंत्र, अनेकदा नकारात्मक मूल्ये विकसित करतो, तेव्हा त्याला 'विचलनाची उपसंस्कृती' (Subculture of Delinquency) म्हटले जाते. या अध्ययनात विचलनामागची सामाजिक, आर्थिक, कौंटुंबिक, समवयस्क गटांच्या प्रभावाचे विश्लेषण करण्यात आले आहे. तांत्रिक आणि मानसिक कारणे शोधण्यात आली आहेत. संशोधनातून असे दिसून येते की, बेरोजगारी, पालकांशी तुटलेला संवाद आणि सोशल मीडियाचा अनियंत्रित प्रभाव यामुळे युव , अंमली पदार्थ, टोळीयुद्धे आणि सायबर गुन्ह्यांकडे वळत आहेत. विचलनाची उपसंस्कृती ही समजशास्त्रातील एक प्रमुख संकल्पना आहे, जी मुख्य संस्कृतीतील स्वीकृत मूल्ये आणि मापदंडाचा तिरस्कार करणाऱ्या उप समूहाच्या संस्कृतीला संदर्भित करते. जी अल्बर्ट कोहेन यांच्या “Delinquent Boys: The Culture of the Gang” मधून उदयास आली. कोहेन यांच्या सिद्धांतानुसार, निम्नवर्गीय तरुण मुलांमध्ये मुख्य मध्यमवर्गीय तरुण मुलांमध्ये मुख्य मध्यमवर्गीय मूल्ये जसे शैक्षणिक यश, महत्वाकांक्षा प्राप्त करण्यात अपयश आल्यास, ते वैकल्पिक उपसंस्कृती विकसित करतात. जी मुख्य संस्कृतीच्या विरुद्ध मूल्ये जसे की हिंसा, गुंडागर्दी, क्षणिक आनंद इत्यादी बाबींना प्राधान्य देते.

संशोधनात प्रामुख्याने अल्बर्ट कोहेन यांचा ‘उपसंस्कृती सिद्धांत’ आणि रॉबर्ट मर्टन यांचा ‘साध्य-साधन विसंगती सिद्धांत याचा आधार घेण्यात आला आहे. मध्यमवर्गीय मूल्यांशी जुळवून घेण्यास अपयशी ठरलेले युवक स्वत:ची एक स्वतंत्र मूल्यव्यवस्था निर्माण करतात, ज्याला ‘उपसंस्कृती’ म्हटले जाते. या प्रक्रियेत झपाट्याने होणारे शहरीकरण, सोशल मिडियाचा अतिवापर, बेरोजगारी, विभक्त कुटुंब पद्धती आणि व्यसनाधीनता हे घटक महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात. सदर अध्ययनासाठी विचलनाच्या विविध प्रकारांचे, जसे की सायबर गुन्हेगार, अंमली पदार्थांचे सेवन आणि आक्रमकता, यांचे निरीक्षण करण्यात आले आहे. निष्कर्षावरून असे दिसून येते की, जेव्हा समाजातील मुख्य प्रवाहाकडून युवकांच्या आकांक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा ते विचलनाचा मार्ग स्वीकारतात. शेवट, या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी समुपदेशन, रोजगाराच्या संधी आणि नैतिक शिक्षणाची आवश्यकता असल्याचे  प्रतिपादन केले आहे.      

Downloads

Published

2026-04-16

How to Cite

डॉ. विनोद श्रावण शेंडे. (2026). युवकांमधील विचलनाची उपसंस्कृती: एक समाजशास्त्रीय अध्ययन. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 1198-1207. https://doi.org/10.64751/qdh79v05