स्त्रीवादी दृष्टिकोन आष्टि महात्मा फुल

Authors

  • डॉ. प्रमोद देष्टवदास पाटील Author

DOI:

https://doi.org/10.64751/pecpa467

Abstract

भारतीय समाजशास्त्राच्या इतिहासात १९ वे शतक हे प्रबोधनाचे शतक मानले जाते. या काळात महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडलेले विचार हे केवळ सुधारकवादी नसून ते पूर्णतः क्रांतिकारी होते. प्रस्तुत शोधलेखामध्ये महात्मा फुले यांच्या कार्याचे स्त्रीवादी दृष्टिकोनातून (Feminist Perspective) समाजशास्त्रीय विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्रीत्वाची पहिली ठिणगी भारतात ज्यांनी टाकली, त्या महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या गुलामगिरीचा संबंध थेट ब्राह्मणवादी व्यवस्था, जातिव्यवस्था आणि पितृसत्ताक (Patriarchy) रचनेशी जोडला होता. हा दृष्टिकोन आजच्या आधुनिक स्त्रीवादाचा पाया मानला जातो. फुले यांनी जात आणि वर्ग यांच्या संघर्षाचेही विश्लेषण गुलामगिरी या ग्रंथात केले, ज्यातून दलितांच्या दैन्यावस्थेचे केवळ परिणाम नसून त्या पद्धतीने आपले सत्ता टिकवण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. त्यांनी स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची शोषणाची विश्लेषण केले. त्यांच्या मते, जोपर्यंत स्त्रिया शिक्षित होत नाहीत, तोपर्यंत समाज गुलामगिरीतून मुक्त होऊ शकत नाही. शिक्षणाद्वारे सक्षमीकरण हीच त्यांच्या विचारांची मुख्य भूमिका होती.

१८४८ मध्ये पुण्यात सुरू केलेली मुलींची पहिली शाळा ही केवळ शैक्षणिक संस्था नव्हती, तर ती पुरुषप्रधान संस्कृतीला दिलेला एक मोठा धक्का होती. स्त्रियांना शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न हा सामाजिक न्यायासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा होता. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांचे योगदानही अत्यंत मोलाचे होते. विधवा विवाह, केशवपन प्रथा विरोध आणि बालहत्य प्रतिबंधक गृहांची स्थापना यामधून त्यांनी स्त्रियांच्या जीवनात सुधारणा घडवून आणली. स्त्री-पुरुष समतेचा पुरस्कार करत त्यांनी स्त्रियांना पुरुषांच्या समकक्ष स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

फुले यांच्या विचारांमध्ये आधुनिक स्त्रीवादाचे अनेक घटक दिसून येतात. त्यांनी केवळ स्त्रियांच्या प्रश्नांवर विचार मांडले नाहीत, तर शोषणाच्या मुळावर म्हणजेच पितृसत्तेवर प्रहार केला. त्यांच्या दृष्टिकोनात आजच्या भाषेत Intersectionality म्हणजेच जात, वर्ग आणि लिंग यांचा एकत्रित विचार दिसून येतो. आजच्या २१ व्या शतकातील स्त्रीवादी चळवळींमध्ये महात्मा फुले यांचे विचार अजूनही दिशादर्शक ठरतात।

Downloads

Published

2026-04-16

How to Cite

डॉ. प्रमोद देष्टवदास पाटील. (2026). स्त्रीवादी दृष्टिकोन आष्टि महात्मा फुल. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 1327-1332. https://doi.org/10.64751/pecpa467