प्रसार माध्यमात साहित्य आणि संगीत
DOI:
https://doi.org/10.64751/0wtrv144Abstract
आधुनिक युगात प्रसारमाध्यमे हे जनसंवादाचे आणि अभिव्यक्ती प्रकटनेचे सुलभ व प्रभावी साधन बनले आहे. साहित्य आणि संगीत क्षेत्रात या प्रसार माध्यमांचे लक्षणीय योगदान आहे. 'हे विश्वची माझे घर' ही संकल्पना आजतागायत मानवाला तितकीशी स्वीकारणे शक्य झालेले नाही मात्र मानवनिर्मित प्रसार माध्यमांनी ते निर्विवाद सिद्ध केले आहे! वर्तमानपत्रे, मासिके, रेडिओ, टीव्ही, चित्रपट ही सगळी प्रसार माध्यमे आपल्या आयुष्यात महत्त्वाची होऊन बसलेली आहेत. पण या सगळ्यांवर कळस ठरलेले माध्यम म्हणजे इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया! मोबाईलवरील व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, युट्युब आणि इन्स्टाग्राम या सगळ्यांनी तर आपल्या मनावर गारुड केले आहे.
साहित्य आणि संगीताच्या श्रेष्ठश्रेष्ठतेचा विषय असू नये त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण ते अन्योन्याश्रित आहेत. साहित्य म्हणजे मला अर्थ आहे पण मला खरे बोलके केले ते संगीतानेच. साहित्याने संगीताला बहर आणला तर संगीताने साहित्याला फुलवले! सरस्वतीने डाव्या हातात ज्ञानपुस्तिका आणि उजव्या हाती वीणा धारण करणे, हे साहित्य आणि संगीताच्या एकरूपत्वाचे प्रतीक म्हणावे लागेल!
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






