स्थलांतर आणि ग्रामीण युवा पिढी
DOI:
https://doi.org/10.64751/985j3z85Abstract
भारतीय समाज व्यवस्थेचा मुख्य कणा हा ग्रामीण समुदाय आहे. आज २१ व्या शतकात आणि विज्ञान युगातील ग्रामीण व्यवस्थेत अनेक आव्हानात्मक बदल हे निश्चितच तरुण पिढीला स्थलांतर प्रक्रियेकडे एक मूलभूत आणि ग्रामीण समाज व्यवस्थेच्या एक अंगभूत घटक म्हणून स्वीकारायला भाग पाडत आहे. अर्थात नवीन ग्रामीण व्यवस्थेच्या बदलांमध्ये लोकसंख्या स्थलांतरांत महत्त्वाचा घटक ठरलेली ग्रामीण व्यवस्था आणि तरुण पिढीला स्थलांतराची व्यवस्था स्वीकारण्यास आकर्षित करत पाहत आहे. २०२४–२५ च्या लोकसंख्या अहवालानुसार २६८ मिलियन लोकसंख्या ही (१५–२९ वर्ष वयोगट) ही आजही ग्रामीण भारतात वास्तव्यास आहे, त्यातील २०.७% युवा ग्रामीण लोकसंख्या ही बेरोजगार आहे, आणि बाकी तरुण पिढी ही आजही इतर व्यवसाय तसेच पारंपरिक व्यवसायाकडे वळल्याचे दिसते. यातून भारतीय ग्रामीण समुदायामध्ये अनेक सामाजिक, नैतिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्ट्याने आव्हानात्मक बदलांना या नव्या आर्थिक व्यवस्थेच्या निर्मितीने स्थलांतर प्रक्रिया एक आव्हान ठरत आहे, आणि यातून उद्भवलेले वाढते शहरीकरण, जागतिकीकरण, आधुनिकीकरण, सांस्कृतिकीकरण, पाश्चिमात्यीकरण यासारख्या अनेक समस्यांना सामना देखील आज या स्थलांतर प्रक्रियेच्या निमित्ताने भारतीय ग्रामीण समाज व युवा वर्गांपुढे फार मोठी गंभीर समस्या बनल्याचे दिसून येते.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






