स्पर्धा परीक्षांचा इतिहास आणि महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा: एक अभ्यास

Authors

  • मोहिनी मधुकरराव राऊत, डॉ. सुभाष वा. धोटे Author

DOI:

https://doi.org/10.64751/f7nvdm73

Abstract

"स्पर्धा परीक्षांचा इतिहास आणि महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा: एक अभ्यास" या संशोधनाचा मुख्य उद्देश स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? हे जाणून घेणे. त्यासोबतच स्पर्धा परीक्षांच्या ऐतिहासिक विकासाचा आढावा घेणे व त्यासोबतच महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या प्रमुख स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे आहे. या संशोधनामध्ये प्राचीन काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय प्रशासनाच्या स्थापनेतील परीक्षापद्धतीचा अभ्यास करण्यात आला आहे.

तसेच महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. एम.पी.एस.सी., पोलीस भरती, शिक्षक भरती इत्यादी परीक्षांचे स्वरूप, पात्रता व अटी, रचना यांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासातून असे दिसून येते की, स्पर्धा परीक्षा प्रणाली ही गुणवत्तेवर आधारित निवड करण्याची प्रक्रिया असून यामुळे प्रशासनात पारदर्शकता वाढते. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची ही युवकांना आपल्या पाहणीनुसार योग्य संधी उपलब्ध करून देणारी यंत्रणा आहे.

Downloads

Published

2026-03-19

How to Cite

मोहिनी मधुकरराव राऊत, डॉ. सुभाष वा. धोटे. (2026). स्पर्धा परीक्षांचा इतिहास आणि महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा: एक अभ्यास. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 1395-1401. https://doi.org/10.64751/f7nvdm73