पश्चिम विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या आणि हवामान बदल : 2016-2026
DOI:
https://doi.org/10.64751/vvzc2282Abstract
संत्रा हे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे नगदी व फळपीक असून अनेक शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नाशी त्याचा जवळचा संबंध आहे. संत्रा उत्पादनावर तापमान, पर्जन्यमान, पाण्याची उपलब्धता, सिंचन, मृदा परिस्थिती, उत्पादनखर्च आणि बाजारपेठीय परिस्थिती यांचा परिणाम होतो. उपलब्ध साहित्याच्या समीक्षेतून संत्रा उत्पादकांना उत्पादन व विपणनातील अडचणी, वाढता उत्पादनखर्च, भांडवल व कर्जाची उपलब्धता, सिंचन व वीजपुरवठा, बाजारभावातील चढ-उतार, वाहतूक, साठवणूक आणि प्रक्रिया सुविधांचा अभाव अशा विविध आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते. हवामानाशी संबंधित अभ्यासांमध्ये दुष्काळ, पाण्याची कमतरता, तापमानवाढ आणि अनिश्चित हवामानामुळे उत्पादन व आर्थिक स्थितीवर परिणाम होत असल्याचे तसेच ठिबक सिंचन, कार्यक्षम सिंचन व्यवस्था, हवामान अंदाज, कीड व्यवस्थापन आणि इतर अनुकूलन उपायांचा वापर होत असल्याचे आढळते. प्रस्तुत समीक्षा 2016-2026 या अभ्यासकालाच्या संदर्भात उपलब्ध संशोधनातील प्रमुख निष्कर्ष, अभ्यासक्षेत्रे आणि संशोधनातील उणीवा स्पष्ट करते. उपलब्ध साहित्यामध्ये उत्पादन, विपणन, सामाजिक-आर्थिक वैशिष्ट्ये आणि दुष्काळ /अनुकूलन यांचा स्वतंत्रपणे अभ्यास झालेला दिसतो; मात्र पश्चिम विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या आर्थिक समस्या आणि हवामान बदल यांचा एकात्मिक आर्थिक दृष्टिकोनातून अभ्यास तुलनेने मर्यादित आहे. त्यामुळे उत्पादन, उत्पादनखर्च, उत्पन्न, सिंचनखर्च, बाजारभाव, कर्जबाजारीपणा, पीकविमा, आर्थिक सुरक्षितता आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्याच्या उपाययोजनांचा परस्परसंबंध तपासण्याची आवश्यकता अधोरेखित होते.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






