लोकप्रिय संस्कृती, चिक भाषा आणि साहित्य
DOI:
https://doi.org/10.64751/012b7n96Abstract
आधुनिक काळात जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे समाजातील सांस्कृतिक प्रवाहामध्ये मोठे बदल झाले आहेत. या बदलामुळे "लोकप्रिय संस्कृती" (Popular Culture) ही संकल्पना विशेष महत्वाची ठरली आहे. लोकप्रिय संस्कृती ही सामान्य लोकांच्या जीवनाशी संबंधित असून ती माध्यमे, मनोरंजन, उद्योग, फैशन, संगीत आणि साहित्य यांच्या माध्यमातून विकसित होत असते. या लोकप्रिय संस्कृतीच्या प्रभावामुळे "चिक भाषा" ( Chick Language) आणि "चिक साहित्य" ( Chick literature) हे नवे साहित्य प्रवाह उदयास आलेले आहे. चिक साहित्य मुख्यतः आधुनिक स्त्रियांच्या जीवनानुभवांवर आधारित असून त्यामध्ये प्रेम संबंध, करिअर, मैत्री, कुटुंबव्यवस्था, स्वातंत्र्य आणि सामाजिक अपेक्षा यांसारख्या विषयाचे चित्रण केले जाते. या साहित्याची भाषा साधी, संवादप्रधान आणि विनोदी स्वरुपाची असते. ज्यामुळे वाचकांशी सहज संवाद साधला जातो. यात लोकप्रिय संस्कृती, चिक भाषा, आणि चिक साहित्य यांचा परस्पर संबंध कसा आहे हे स्पष्ट केले आहे. विशेषत: आधुनिक माध्यमे, जाहिरात, चित्रपट, फॅशन आणि शहरी जीवनशैली यांचा चिकसाहित्यावर कसा प्रभाव पडतो यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. तसेच स्त्री अनुभवाचे प्रतिनिधित्व, स्त्रीच्या स्वातंत्र्याची जाणीव आणि सामाजिक बदलांचे प्रतिबिंब साहित्यामध्ये कशाप्रकारे दिसून येते हे स्पष्ट केले आहे. चिक साहित्य हे केवळ मनोरंजनात्मक साहित्य नसून आधुनिक समाजातील स्त्रियांच्या बदलत्या जीवनदृष्टीचे आणि सांस्कृतिक परिवर्तनाचे प्रतिनिधित्व करणारे महत्त्वाचे साहित्य प्रवाह आहे. चिक भाषा - चिक साहित्य, या माध्यमातून स्त्रियांच्या जीवनाचे वास्तव चित्रण होते. त्यामुळे या साहित्यप्रकाराला आधुनिक मराठी साहित्यामध्ये विशेष महत्व प्राप्त झाले आहे. लोकप्रिय संस्कृतीमुळे हे साहित्य अधिक आधुनिक आणि वास्तववादी झाले आहे. त्यामुळे लोकप्रिय लोकसंस्कृती आणि स्त्री अनुभव समजून घेण्यासाठी चिक साहित्याचा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरतो. विशेषत: १९९० नंतरच्या काळात या साहित्यप्रकाराला जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळाली. लोकप्रिय संस्कृती चिक भाषा, चिक साहित्य हे आधुनिक समाजातील महत्त्वाचे सांस्कृतिक घटक आहेत.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






