छत्रपती शिवाजी महाराजांच्या केंद्रीय प्रशासनात अष्टप्रधान मंडळाची भूमिका
DOI:
https://doi.org/10.64751/ce9b0853Abstract
प्राचीन भारतीय ग्रंथांनी धर्मास श्रेष्ठ मानून राज्य व समाजाची सर्व व्यवस्था त्या केंद्रित मर्यादित केली असल्याने राजाला राज्याचे पालन करताना धर्माचे साधन करावयाचे होते. राजधर्माचे राज्यकारण, प्रशासन, धर्मपरंपरा, धर्मनिष्ठा इत्यादींचे संस्कृतीत अंतर्भाव होता. त्या काळात राजकारभार पाहण्यासाठी ‘प्रधानांची’ नेमणूक केली जात होती. रामायण, महाभारत, मनुस्मृती व शुक्रनीती यामध्ये प्राचीन ग्रंथात ‘प्रधानांचा’ उल्लेख आढळतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रशासन व्यवस्था अत्यंत सुसंघटित व स्पष्ट होती. कारण शिवराज्याचा मुख्य पाया ‘लोककल्याण’ साध्य करणे हा होता. तर दुसरे म्हणजे योग्य प्रशासनाची व कार्यक्षमतेची व्यवस्था करणे हे उद्दिष्ट होते. लोककल्याण साधण्यासाठी कार्यक्षम प्रशासन आवश्यक होते. त्यामुळे एकट्या व्यक्तीवर अवलंबून न राहता कार्यक्षम व सुयोग्य प्रशासन रचना करण्यात आली.
शिवाजी महाराजांनी राज्य संरक्षण व जनतेचे राज्य निर्माण करण्यासाठी योग्य प्रशासन निर्माण केले. त्यासाठी त्यांनी राज्यकारभारात मदत करण्यासाठी आठ विभाग निर्माण केले ज्याला ‘अष्टप्रधान मंडळ’ म्हणतात.
या अष्टप्रधान मंडळामध्ये प्रमुख पदे म्हणजे —
पेशवा, अमात्य, सचिव, सुमंत, मंत्री, सेनापती, न्यायाधीश आणि पंडितराव ही आठ पदे समाविष्ट होती.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






