सद्यास्थितीचा स्त्रीत्वावर पडलेला प्रभाव

Authors

  • प्रा. वैशाली प्र. चौधरी Author

DOI:

https://doi.org/10.64751/vha07s38

Abstract

सद्याकाळातील जागतिकीकरण, तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल, बदलती आर्थिक-सामाजिक रचना यामुळे स्त्रीत्वाच्या संकल्पनेवर (Femininity) सखोल परिणाम झालेला दिसून येतो. हा संशोधन पेपर ‘स्त्रीत्व’ या संकल्पनेची व्याख्या केवळ जैविक किंवा पारंपरिक सामाजिक संदर्भांत न करता, ती एक सामाजिक, सांस्कृतिक, मानसशास्त्रीय आणि आर्थिक बांधणी आहे, या भूमिकेतून तिचा परामर्श घेतो. प्रस्तुत संशोधनाचे उद्दिष्ट सद्यस्थितीतील प्रजनन तंत्रज्ञानातील प्रगती, आर्थिक क्षेत्रातील महिलांचा सहभाग, मानसिक आरोग्याविषयीची वाढती जागरूकता, राजकीय सक्षमीकरण, तसेच पारंपरिक श्रद्धांचे स्वरूप या विविध पैलूंचा स्त्रीत्वाच्या नव्या व्याख्येशी असलेला संबंध तपासणे हे आहे. गृहीत धरण्यात आले आहे की सद्यस्थितीने स्त्रीत्वाला आव्हाने दिली आहेत, परंतु त्याचबरोबर स्त्री-केंद्रित विकासाला (Women-led Development) नवी दिशा आणि संधीही उपलब्ध करून दिल्या आहेत. अभ्यासासाठी गुणात्मक  संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून, विविध प्राथमिक आणि दुय्यम स्त्रोतांमधून मिळालेल्या माहितीचे विश्लेषणात्मक पद्धतीने सादरीकरण केले आहे. निष्कर्षांत असे दिसून येते की, स्त्रीत्वाची संकल्पना स्थिर न राहता सतत प्रवाही आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारी आहे. तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेने स्त्रीला नवे सामर्थ्य दिले आहे, तर दुसरीकडे तणाव, हॉर्मोनल असंतुलन आणि नव्या नैतिक प्रश्नांनी स्त्रीत्वाच्या पारंपरिक समजुतींवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या बदलांशी जुळवून घेण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोनाची आवश्यकता आहे, जो स्त्रीच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा सर्वांगीण विचार करेल.

Downloads

Published

2026-04-16

How to Cite

प्रा. वैशाली प्र. चौधरी. (2026). सद्यास्थितीचा स्त्रीत्वावर पडलेला प्रभाव. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 1125-1135. https://doi.org/10.64751/vha07s38