सामाजिक संबंधांवर सोशल मीडियाचा प्रभाव

Authors

  • डॉ. मोतीराज रामदास चव्हाण Author

DOI:

https://doi.org/10.64751/yzf3yx84

Abstract

सोशल मीडियाचा वापर समाजावर व्यापक परिणाम घडवून आणत आहे. यामध्ये सकारात्मक व नकारात्मक दोन्ही पैलू आहेत. हे माध्यम लोकांमध्ये संवाद व माहितीचे आदान-प्रदान सुलभ करते, परंतु त्याचबरोबर मानसिक आरोग्याच्या समस्या, बनावट बातम्या आणि सामाजिक एकाकीपणा यांसारख्या समस्या निर्माण होतात.

डिजिटल समाजात गोपनीयता (Privacy) आणि ओळख (Identity) यांचे प्रश्नही अत्यंत महत्त्वाचे ठरतात. वैयक्तिक माहितीचे संकलन व कमी गोपनीयता सेटिंग्जमुळे माहितीच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. तसेच ऑनलाइन ओळखीची सत्यता आणि बनावट खात्यांची समस्या देखील गंभीर आहे. डिजिटल दरी ही तांत्रिक साधनसामग्री व इंटरनेट प्रवेशातील असमानतेशी संबंधित आहे, जी सामाजिक व आर्थिक विषमता वाढवते आणि लोकांना संधींपासून वंचित ठेवते.

     

Downloads

Published

2026-03-19

How to Cite

डॉ. मोतीराज रामदास चव्हाण. (2026). सामाजिक संबंधांवर सोशल मीडियाचा प्रभाव. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 1402-1411. https://doi.org/10.64751/yzf3yx84