भारतीय महिलांच्या आर्थिक व सामाजिक समस्या: एक समाजशास्त्रीय विवेचन
DOI:
https://doi.org/10.64751/q5kewg48Keywords:
महिलांचे प्रश्न, आर्थिक महत्त्व, सामाजिक विकास, समाज व्यवस्था, समानताAbstract
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विशेषता मध्ययुगीन समाजात महिलांवर जे अन्याय अत्याचार बंधने होती ती दूर करण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यावर भारताने लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार केला. आणि भारतीय राज्यघटनेत स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या मानवी मूल्यांचा भारतीय संविधानात समावेश करण्यात आला. भारतीय राज्यघटनेनुसार सर्व प्रकारच्या विषमता नष्ट करण्यात आल्या, लिंग असमानतेमुळे महिलावर लादली असलेले सर्व प्रकारची निर्बंध हटविण्यात येऊन महिलांना समान अधिकार देण्यात आले. एवढेच नव्हे तर लिंग विषमता पाळणे कायद्याने गुन्हा ठरविण्यात आले. भारतीय समाजात स्त्रीला पतीची अर्धांगिनी म्हटले आहे. स्त्रियांना आदिशक्ती, जगत जननी, माता लक्ष्मी, गृहलक्ष्मी, गृहदेवता, देवी अशा विविध संबोधनाने संबोधिल्या जाते. वैदिक कालखंडापासून ते 19 व्या शतकाच्या कालखंडापर्यंत महिलांना अनेक संकटांना सामोरे जावं लागलं. याच कालखंडात अनेक रूढी परंपरांनी स्त्रियांना काळीज हेलावून टाकणारे दुःख दिल्याचे दिसून येते. मात्र एवढे असूनही याही काळात कर्तुत्ववान स्त्रियांचे उल्लेख आढळतात. इसवी सनाच्या आठव्या-नवव्या शतकापर्यंत कर्तुत्ववान कर्तबगार आणि विदुषी महिलांचे स्वतंत्र उल्लेख पहावयास मिळतात.
स्त्रीची विवाह आणि पुत्र जन्माने योग्यता तपासल्या जात होती. डॉ. मंगला आठवलेकर यांच्या लेखणीतून महापुरुषांच्या नजरेतून स्त्री या पुस्तकात विचार व्यक्त करतात. की स्त्री पुरुष असा फरक करत स्त्रीचा जेवढा वापर करणं शक्य झालं आहे. तेवढा करत आणि पायातील वाहन पायीच बरी असे म्हणत साऱ्यांनी स्त्रीला तुडवता येईल तितकं तुडवलं.
भारतीय समाजात स्त्रियांवर अनेक प्रकारची बंधने लागण्यात आली होती. जैवशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर जगातील सर्व माणसे समान सारखे आहेत. प्रत्येकाच्या मूलभूत गरजा सारखे आहेत. मात्र असे असूनही इथली माणसे धर्म, लिंग, वय, वंश आणि श्रीमंती या आधारावर इथे समाजा समाजामध्ये विभिन्नता आढळते. यामध्ये शूद्र, पशु, ढोर, गवार और नारी ये सब ताडन के अधिकारी या उक्तीप्रमाणे स्त्रियांच्या वाट्याला फार हलाखीचे दिवस आल्याचे दिसते. महिलांना हुंडाबळी, देवदासी जीवनसाथीची निवड घरगुती हिंसा बाल अपराचिता जातीभेद, लिंग, विषमता वृद्ध महिला अशा कित्येक समस्यांना सामोरे जाऊन जीवन जगावे लागते. शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, आर्थिक समस्या स्त्रियांपुढे आ वासून उभ्या आहेत, माझ्यासमोर कोणती समस्या नाही असे सांगणारा मनुष्यप्राणी दुर्मिळ असू शकेल, महिलांची आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती सुधारली तर वैश्विक बदल घडतो. महिलांचे योग्य सामाजीकरण केले, तर स्त्री ही जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उधारी असे होऊ शकते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शाळेच्या रूपाने लावलेले ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे रोपटे जागतिक स्तरावर गाजते. त्यांनी भेदभावाच्या नावाखाली होणाऱ्या अज्ञानाला विज्ञानाचा पर्याय दिला. त्यांनी दाखवून दिले की जेव्हा एक स्त्री शिकते तेव्हा, ती केवळ एक कुटुंबच नाही तर अख्या समाज आणि इतिहास बदलण्याची ताकद ठेवते. भारतीय राज्यघटनेने महिलांना आर्थिक व सामाजिक क्षेत्रात पुरुषांनी इतकेच समान अधिकार दिले आहेत. स्त्री आणि पुरुषांचा दर्जा समान आहे. मात्र असे असले तरी सुद्धा अजूनही भारतात महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास सन्मान दर्शक नाही.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






