आदिवासी समाजाच्या बालकांमधील कुपोषण व त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम

Authors

  • शीतल रविंद्र ठाकरे, डॉ. वंदना नामदेव बनकर Author

DOI:

https://doi.org/10.64751/ka22m709

Keywords:

कुपोषण, आहार, आरोग्य, अज्ञान, संसर्गजन्य आजार

Abstract

भारत हे विकसित राष्ट्राचे स्वप्न आपण पाहतांना दारिद्र्य, कुपोषण आणि बेरोजगारी इत्यादी समस्या देशात मोठ्या प्रमाणावर आहेत. कुपोषण जागतिक पातळीवरील भिषण समस्या आहे. शासनाने पोलिओ निर्मूलन मोहिम यशस्वीरित्या राबविणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील आदिवासी समाजाचे वस्तीचे अध्ययन करतांना असे दिसून आले की, या तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यात मुलींचे कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण कारणांचा शोध घेतांना असे लक्षात आले की, मुलगा वंशाचा दिवा, मुलगी परक्याचे धन ही मानसिकता, मुलींच्या पोषणाबाबत उदासीनता, गर्भवती स्त्रियांचे पोषण आणि पती हट्ट असमानतेमुळे या तीन दुर्बल घटकांकडे अतिशय दुर्लक्ष, उपासमारी दिवस आलेली. ग्रामीण आदिवासींना अशिक्षण, दारिद्र्य, पोषणाबाबत अज्ञान, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, पालकांचे व्यसनाधीनता, दुर्गम भागातील वास्तव्य आणि वैद्यकीय सोयी अभाव इत्यादी कारणे दिसून आली. बालकांमध्ये कुपोषणाच्या स्थितीमुळे सर्दी, खोकला, ताप, न्यूमोनिया, हगवण इत्यादी संसर्गजन्य आजार, वजनात घट, त्वचेवर सुरकुत्या, रक्ताल्पता व बौद्धिक विकासातही सामान्य बालकांच्या तुलनेत मागे दिसतात.

Downloads

Published

2026-03-19

How to Cite

शीतल रविंद्र ठाकरे, डॉ. वंदना नामदेव बनकर. (2026). आदिवासी समाजाच्या बालकांमधील कुपोषण व त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 1359-1363. https://doi.org/10.64751/ka22m709