गोंदिया जिल्हयातील लिंग गुणोत्तर आणि भौगोलिक परिप्रेक्ष्य - एक लोकसांख्यिक विश्लेषण
DOI:
https://doi.org/10.64751/na2r2e07Keywords:
लिंग गुणोत्तर, लोकसंख्या रचना, स्त्री-पुरुष प्रमाण, सामाजिक विकास.Abstract
या अभ्यासात गोंदिया जिल्ह्यातील लिंग गुणोत्तराचा सन 2001 आणि 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे तालुकानिहाय विश्लेषण करण्यात आले आहे. लिंग गुणोत्तर हे लोकसंख्येच्या रचनेचा महत्त्वपूर्ण निर्देशक असून समाजातील स्त्री-पुरुष प्रमाण, सामाजिक स्थिती आणि विकासाची पातळी यांचे प्रतिबिंब दर्शविते. या अभ्यासात तिरोडा, गोरेगाव, गोंदिया, आमगाव, सालेकसा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी या तालुक्यांमधील स्त्री-पुरुष प्रमाणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
सन 2001 मध्ये जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 101 होते, तर 2011 मध्ये ते 102 झाले असून जिल्ह्यात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत किंचित अधिक असल्याचे दिसून येते. तालुकानिहाय विश्लेषणात काही तालुक्यांमध्ये लिंग गुणोत्तरात वाढ (गोंदिया, सडक अर्जुनी, देवरी) दिसून येते, तर काही तालुक्यांमध्ये स्थिरता (गोरेगाव, आमगाव) आढळते. मात्र तिरोडा तालुक्यात लिंग गुणोत्तरात थोडी घट दिसून येते. सालेकसा आणि देवरी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर आढळते, तर अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा येथे तुलनेने कमी लिंग गुणोत्तर दिसून येते.
एकंदरित 2001 ते 2011 या कालावधीत गोंदिया जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात किंचित सुधारणा झालेली दिसते. बहुतेक तालुक्यांमध्ये स्त्री-पुरुष प्रमाण संतुलित किंवा स्त्रियांच्या बाजूने असल्यामुळे जिल्ह्याची लोकसंख्यात्मक व सामाजिक स्थिती समाधानकारक असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






