भारतातील गिग अर्थव्यवस्था: रोजगारातील लवचिकता, उत्पन्न स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा: एक समीक्षात्मक अभ्यास

Authors

  • सचिन विजय शिवधारकर, डॉ. आर. आर. चव्हाण Author

DOI:

https://doi.org/10.64751/6qzxq793

Keywords:

गिग अर्थव्यवस्था, प्लॅटफॉर्म कामगार, रोजगारातील लवचिकता, उत्पन्न स्थैर्य, सामाजिक सुरक्षा, अल्गोरिद्मिक व्यवस्थापन.

Abstract

डिजिटल तंत्रज्ञान, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि मागणीनुसार उपलब्ध होणाऱ्या सेवांच्या विस्तारामुळे रोजगाराच्या स्वरूपात मोठे परिवर्तन झाले आहे. या परिवर्तनाचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे गिग अर्थव्यवस्था आणि प्लॅटफॉर्म आधारित कामांचा विस्तार. भारतात खाद्यपदार्थ वितरण, प्रवासी वाहतूक, फ्रीलान्सिंग, घरगुती सेवा, आयटी प्रकल्पांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये गिग कामगारांची संख्या वाढत आहे. गिग कामामुळे रोजगारातील लवचिकता, प्रवेशाची सुलभता आणि अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतात; परंतु त्याच वेळी उत्पन्नातील अनिश्चितता, दीर्घ कामाचे तास, रोजगार असुरक्षितता, अल्गोरिद्मिक नियंत्रण आणि सामाजिक सुरक्षेचा मर्यादित प्रवेश यांसारख्या समस्या देखील निर्माण होतात.

या शोधपत्राचा मुख्य उद्देश गिग अर्थव्यवस्थेतील रोजगारातील लवचिकता, उत्पन्न स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा या तीन प्रमुख आर्थिक आयामांमधील संबंधांचा आढावा घेणे हा आहे. २०१९ ते २०२५ या कालावधीतील भारत केंद्रित तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या अभ्यासांचा विस्तारपूर्वक अभ्यास करण्यात आला आहे. उपलब्ध साहित्याच्या विश्लेषणातून असे दिसून येते की रोजगारातील लवचिकता ही गिग कामाचे प्रमुख आकर्षण असले तरी ती नेहमी आर्थिक स्थैर्य किंवा वास्तविक स्वावलंबनाचे पर्याय ठरत नाही.

विशेषतः भारतातील खाद्य वितरण व वाहतूक क्षेत्रातील कामगारांमध्ये उत्पन्नातील चढ-उतार, कामाशी संबंधित खर्च आणि सामाजिक सुरक्षा यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे.

समीक्षणातून असे स्पष्ट झाले आहे की विद्यमान धोरणांमध्ये अनेक पोकळी स्पष्ट झाल्या आहेत. महाराष्ट्रातील जिल्हास्तरीय अभ्यासांची कमतरता, उत्पन्न-खर्च-बचत-कर्ज-सामाजिक सुरक्षा यांचा एकत्रित आर्थिक अभ्यासांचा अभाव आणि रोजगारातील लवचिकता व उत्पन्न स्थैर्य यांच्यातील परस्परसंबंधांचे मर्यादित विश्लेषण या संशोधनाच्या प्रमुख पोकळ्या आहेत.

Downloads

Published

2026-07-15

How to Cite

सचिन विजय शिवधारकर, डॉ. आर. आर. चव्हाण. (2026). भारतातील गिग अर्थव्यवस्था: रोजगारातील लवचिकता, उत्पन्न स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा: एक समीक्षात्मक अभ्यास. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(3), 415-421. https://doi.org/10.64751/6qzxq793

Similar Articles

1-10 of 85

You may also start an advanced similarity search for this article.